सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील विंझर ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांसाठी पिण्याचे स्वच्छ व निर्जंतूक पाणी पुरवण्याचा सशुल्क 'चिलर प्लांट' सुरू - केला आहे. ऐन कडक उन्हाळ्याच्या तोंडावर थंड पाणी - मिळाल्यामुळे स्थानिकांनी - समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यातील हा पहिलाच प्रयत्न असल्याचे सरपंच मोनाली लिम्हण यांनी सांगितले.
मागील वर्षी पुण्यातील रोटरी क्लबने स्वच्छ व शुध्द, निर्जतूक पाण्याचा प्रकल्प ग्रामपंचायतीला बसवून दिला. त्यातून शुध्द नागरिकांनाळ बाराही महीणे आता
ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुमारे एक लाख रूपये खर्चुन चिलर प्लांटची नव्याने उभारणी केली. त्यामध्ये एक हजार लीटरची टाकी बसवण्यात आली असून, त्यातून २४ तास पाण्याची सोय केली आहे. प्रकल्पासाठी निळूभाऊ भोसले, राजाभाऊ लिम्हण, विनायक लिम्हण, राहुल सागर, सचिन भोसले, तानाजी भोसले, शिवाजी लिम्हण आदींनी सहकार्य केले. गावात जवळपास ६०० कुटुंब असून दोन हजार लोकसंख्या आहे.
प्रिपेड पाण्याचे एटीएम कार्ड
गावातील ६०० पैकी ४५० कुटुंबानी प्रकल्पातील पाणी मिळण्यासाठी प्रिपेड पाण्याचे एटीएम कार्ड ग्रामपंचातीकडून विकत घेतले आहे. पाचशे रूपये भरल्यानंतर संबंधीतांना पाण्याचा लाभ मिळण्यास सुरवात होते. ग्रामपंचायत कार्यालयात पैसे भरून हे कार्ड मिळते व रिचार्ज केले जाते. मशिनवर स्कॅनर लावला आहे. स्कॅनरसमोर कार्ड धरण्यानंतर एका वेळी आठ लिटर पाणी संबधितांना मिळते. पाचशे रूपयांचे रिचार्ज केल्यानंतर तीन महिने नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे.
सर्वांच्या सहकार्यातून गावातील बहलेक सार्वजनिक व लोकोपयोगी कामे पूर्ण झाली आहेत. सर्व कुटुंबांनी थंड पाण्याचा लाभ घ्यावा. नवीन पाणी कार्डसाठी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहन सरपंच मोनाली लिम्हण यांनी केले आहे.