Baramati News l बारामती तालुका नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी धिरण पवार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुका नाभीक संघटनेच्या अध्यक्षपदी धिरण रविंद्र पवार तर सचिवपदी राहुल जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
         वडगाव निंबाळकर येथील संत सावता माळी सभागृहामध्ये नुकतीच पंचवार्षीक बैठक पार पडली. या कार्यक्रमाचे आयोजन वडगाव निंबाळकर येथील नाभीक बांधवांच्यावतीने करण्यात आले होते. 
     यावेळी महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष रमेश राऊत आणि जिल्हा अध्यक्ष अशोक मगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित तालुका पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
        यावेळी अध्यक्षपदी धिरण पवार, उपाध्यक्षपदी महेश जाधव, कार्याध्यक्षपदी सतिश कर्वे तर सचिवपदी राहुल जाधव यांची निवड करण्यात आली. तसेच बारामती तालुका महिला अध्यक्षपदी राजश्री जगताप तर उपाध्यक्षपदी पुष्पा जाधव, तसेच पश्चिम महाराष्ट्र नाभीक संघटनेच्या उपाध्यक्षपदी सुनिल जगताप यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा कार्यकारीच्यावतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. 
       याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष शंकर मर्दाने, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा मंगला आढाव, जिल्हा संपर्क प्रमुख मच्छिंद्र भिडवे, आदिनाथ गायकवाड, लालासो जाधव, सुनिल जाधव, सागर राऊत, मनोज जाधव, दिपक जाधव, महेश जाधव, सुयश जाधव, गणेश साळुंके, विनायक जाधव, श्रीपाद जाधव, कैलास जाधव, सतिश जाधव, नवनाथ जाधव, मारुती कर्वे, महेश काशिद, हेंमत गायकवाड आदींसह तालुक्यातील समाज बाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रकांत जाधव यांनी केले. तर आभार पांडुरंग पवार यांनी केले. 
              ................................
To Top