सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
जुन्नर : प्रतिनिधी
शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांवर मधमाशांच्या हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात 50 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे.
किल्ले शिवनेरीवरील शिवाई देवी मंदिर परिसरात आग्या मोहळाच्या माशांनी हल्ला केला असून त्यात दहा ते पंधरा पर्यटकांना माशा चावल्या आहेत. शिवाई मंदिर हे पूर्णपणे माशांनी भरले असून मंदिरात दुर्गपेमी अडकलले आहेत. रविवार असल्यामुळे किल्यावर पर्यटकांची गर्दी आहे, माशांचा हल्ला झाल्यामुळे पर्यटक आगदी पळतच किल्ल्यावरून खाली येत आहेत. तर वनविभागाने किल्यावर जाण्यास बंदी घातली आहे.
मधमाशांच्या हल्ल्यात 50 ते 60 जण जखमी झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने पर्यटकांना गडावरून खाली येण्यास सांगितलं. तसेच शिवनेरी किल्ल्यावर दुर्गप्रेमींची धावपळ सुरू झाली. आगी मोहोळाचा हा हल्ला होता, अशी माहिती समोर आलीये. आरोग्य विभागाच्या सहा ते सात अॅम्बुलन्स शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी दाखल झाल्या आहेत. तर काही विद्यार्थी गडावर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वनविभागाचे आगी मोहोळ शांत करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, दगड मारल्यानं मधमाश्यांचं मोहोळ उठलं, असं काही पर्यटकांनी सांगितलं. अनेक पर्यटक या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांना अॅम्ब्युलन्सममधून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच शिवप्रेमींनी गडावर धाव घेत पर्यटकांना खाली आणण्यास सुरूवात केली आहे.