सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
केळघर घाटामध्ये महाबळेश्वर वरून आलेली दुचाकी अवघड वळणावर दरीत कोसळले असून दुचाकीवर दोन जण असल्याचे बोलले जात आहे. मेढा पोलीस घटनास्थळी पोहचले असुन महाबळेश्वर ट्रॅकर्सच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू असल्याची माहिती पोलीस ठाण्यातुन देण्यात आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सातारा महाबळेश्वर रोडवरील केळघर घाटात महाबळेश्वर वरून येताना मुकवली जवळ एका अवघड वळणावर दुचाकीस्वाराचा दुचाकी वरील ताबा सुटल्याने दुचाकी अंदाजे शंभर फूट दरीत कोसळली. याबाबतची माहिती मेढा पोलिस ठाण्याचे सपोनि सुधीर पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेवुन शोध कार्य सुरू केले आहे. यावेळी दरीत उतरल्यानंतर दुचाकी क्र एम एच ११ बी डब्लु ३७२७ मिळून आली असून दुचाकी वरील स्वाती अमोल मोहिते व विक्रम युवराज मोहिते रा. साप, रहिमतपूर येथिल असल्याचे समजते आहे. दुचाकी वरील या दोघांचा शोध घेण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्स च्या जवानांना बोलावण्यात आली असून त्यांनीही शोध कार्य सुरू केले आहे. मात्र अंधार पडल्याने शोधकार्यात अडचण निर्माण झाली आहे.
सातारा महाबळेश्वर रस्त्यावरील केळघर घाटात आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एक दुचाकी मुकवली जवळ घाटातून दरीत कोसळली असून दुचाकी वरील स्वाती अमोल मोहिते व विक्रम युवराज मोहिते रा साप रहिमतपूर जंगलात अजून आढळून आले नाहीत मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि सुधीर पाटील फौज फाट्यासह घटनास्थळी पोचले असून शोधकार्य सुरू आहे महाबळेश्वर ट्रेकर्सला पाचारण करण्यात आले असून अंधार पडला असल्याने शोध कार्यात अडथळा निर्माण झाला आहे.
मेढा पोलीस घटनास्थळी असून शोधकार्य सुरू ठेवण्यात ठेवण्यात येणार असल्याचे सपोनि पाटील यांनी सांगितले.