सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
मेढा दक्षिण विभागातुन एका गावातील अल्पवयीन मुलीला फुस लावुन संभाजी भुजंगा टरके रा. किवळा, नांदेड याने पळवून नेलेची तक्रार मेढा पोलीस दाखल करण्यात आले नंतर दि. १२ रोजी संशयित आरोपीस वाळुंज जिल्हा संभाजीनगर येथून ताब्यात घेण्यात आले असून आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीसांनी माहिती दिली.
राहत्या घरातुन फुस लावून मुलीला दि. २८ फेब्रुवारी रोजी पळवून नेल्याची तक्रार मेढा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्यानंतर पी एस आय गंगावणे यांनी तपास करीत असताना आरोपी हा वाळुंज येथे असल्याची खबर मिळाली. पीएसआय गंगावणे यासह पो.कॉ. सनी काळे, धीरज बेसके यांनी आरोपी संभाजी टरके यास दिनांक 12 मार्च रोजी रात्री तिस एमआयडीसी वाळुंज, जि. छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले.
आरोपी संभाजी टरके यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून आरोपीवर कलम 64, 87, पोस्को कलम 4, 8 हे वाढीव कलमांतर्गत गुन्हा मेढा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे . अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील करीत आहेत.