Jawali News l मेढा पोलिसांचा दारू व जुगार अड्ड्यावर छापा : तिघांवर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
मेढा येथिल पाचवड रोडवर अडोशाला सुरु असलेल्यात अवैध दारू व जुगार अड्यावर पोलीसांनी धाड टाकून साधारण बावीस हजाराचा मुद्दमाल ताब्यात घेतला असून सनी गजानन तांबोळी वय ५०,अनिल कल्याण माने वय ५९ आणि अनिल गायकवाड यांच्या वर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
         याबाबत दिलेल्या माहितीनुसार मेढा पाचवड रोडवर दुंदळे यांच्या किराणा  दुकानाच्या शेजारी झाडाच्या आडोशाला अनिल कल्याण माने वय ५९ वर्षे हा अनिल गायकवाड याचे सांगणेवरुन स्वतःचे अर्थिक फायदेकरीता चिट्टीवर कसले तरी आकडे लिहुन लोकांचेकडुन आकड्यावर पैसे स्विकारून कल्याण नावाचा मटका जुगार घेत असताना सापडले. त्याच्याकडे रोख रक्कम व मटका जुगाराचे साहीत्य असा एकुण २० हजार रू. किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांच्यावर मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
          तसेच झाडाच्या आडोशाला सनी गजानन तांबोळी वय ५० वर्षे, रा. मेढा हा स्वताःचे आर्थिक फायद्याकरीता बेकायदेशीर, विना परवाना देशी दारुची चोरटी विक्री करीत असल्याने त्याचे कडून २४३० रू. किंमतीचा प्रोव्हि. माल ताब्यात घेण्यातआला. त्याचे विरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे सरकार तर्फे फिर्याद दाखल करण्यात आली असून दोन्ही गुन्हांचा तपास  पोलीस हवालदार पी एन उदागे करीत आहेत.
To Top