सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरवळ : प्रतिनिधी
शिरवळ पोलीस स्टेशन सातारा यांचे सतर्कतेमुळे बंगलोर कर्नाटक येथून आपले पत्नीचा खून करून तिला बॅगेत भरून घराला कुलूप लावून मुंबईचे दिशेने पळून जाणाऱ्या आरोपीस त्याचे वाहनासह शिरवळ पोलिसांनी जेरबंद केले आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी, राकेश राजेंद्र खेडेकर वय 35 धंदा नोकरी रा. जोगेश्वरी मुंबई हा मुंबई येथून बेंगलोर येथे फेब्रुवारी 25 मध्ये आपली पत्नी गौरी वय 32 हिचेसह बनारगट्टा तेजस्विनी नगर बेंगलोर येथे राहू लागला. राकेश हा वर्क फ्रॉम होम करीत असून त्याची पत्नी गौरी जॉब शोधत होती. दिनांक 26 मार्च 2025 चे रात्री राकेश याचे कडे पत्नी गौरी हिने पुन्हा मुंबईला जाण्याचा आग्रह धरला. या कारणाने त्यांचे वाद होऊन पत्नी गौरी ही घरातील भांडी आपटू लागली. तेव्हा पती राकेश याने आपण आता राहत असलेल्या रूमचे डिपॉझिट भरलेले आहे आपण जर रूम सोडली तर डिपॉझिट चे पैसे मिळणार नाहीत व येथे येण्यासाठी खूप खर्च झाला आहे. असे तिला समजावीत होता. तरीही गौरी ही त्याचे ऐकत नसल्यामुळे त्यांचे त्या कारणाने वाद होऊन शेवटी पत्नी गौरी हिने घरातील चाकू घेऊन राकेशला मारण्याची भीती दाखवली.
त्याचा राग राकेशला आल्याने राकेशने तिच्या हातातील चाकू घेऊन पत्नी गौरीचे मानेवर गळ्यावर पाठीवर चाकूने वार केले. गौरी जखमी अवस्थेत घराचे लॉबीमध्ये निपचिप पडली. त्यानंतर राकेशला ती मयत झाल्याची खात्री झाली. त्यानंतर राकेशने घरातील मोठी बॅग रिकामी करून त्यामध्ये पत्नी गौरीचे शव ठेवून बॅगेची चेन लावली व ती बॅग राकेशने घराचे बाथरूम बाहेर नेऊन ठेवली.
त्यानंतर दिनांक 27 मार्च 2025 चे रात्री बारा वाजता चे दरम्यान राकेश त्याचे साहित्य सोबत घेऊन त्याचे मालकीची होंडा सिटी कार घेऊन जोगेश्वरी मुंबई येथे जाण्याकरता बेंगलोर येथून रवाना झाला.
पत्नीचा खून केल्यामुळे राकेश ला टेन्शन आले होते त्याने महाराष्ट्रातील कागल या गावी आल्यावर एका मेडिकल दुकानांमधून हार्पिक सनीफीनाईल व झुरळ मारण्याचे औषध घेऊन कोल्हापूर कराड येथे प्रवास करीत असताना राकेशने त्याचे बेंगलोर येथील इमारतीमधील खालचे मजल्यावर राहणारे इसमाला फोन करून त्याने पत्नीचे खुनाबाबत व बॅगेत तिला ठेवलेची माहिती दिली.
त्यानंतर पुढे खंडाळा घाट उतरल्या वर शिरवळ येथील निप्रो कंपनी जवळ हायवे रोडवर राकेश कार घेऊन आला. त्याला केलेल्या खुनाचे टेन्शन आल्याने त्याने विकत घेतलेले सर्व कीटकनाशक व औषधे एकत्र करून पिले. त्याचा त्याला त्रास होऊ लागल्याने राकेश कारमधून बाहेर येऊन रस्त्यावर बसला. राकेश याला पाहून एका मोटरसायकल स्वाराने राकेश ला पाहून त्याची विचारपूस केली असता त्याने फिनाईल पिल्याचे सांगितल्याने दुचाकी स्वाराने त्याला तात्काळ त्याचे कारमधून शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले.
त्या ठिकाणी अगोदरच हजर असलेले शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार कुंभार यांनी राकेश कडे काय झाले याबाबत विचारणा केली असता राकेशने त्याचे पत्नीचे खूणाबाबतचा प्रकार सांगितला.
याबाबत शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी जोगळेकर हॉस्पिटल मधून आवश्यक माहिती घेऊन माननीय पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख यांना ही माहिती दिली. पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ बेंगलोर येथे संपर्क करून गौरीचे खुणाबाबत खात्री केली.
तसेच तेथील संबंधित वरिष्ठ अधिकारी पोलीस स्टेशन इन्चार्ज व इतर संबंधितांचे फोन नंबर पोलीस निरीक्षक नलावडे यांना पुरविले व पुढील तपासकामी सूचना दिल्या. याबाबत आम्ही अप्पर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती वैशाली कडूकर, पोलीस उपविभागीय अधिकारी फलटण विभाग फलटण राहुल धस यांना याबाबत माहिती दिली.
वरिष्ठांचे प्राप्त सूचनेनुसार पुढील कारवाई करून राकेश चे नातेवाईक व बेंगलोर येथील पोलीस अधिकाऱ्यांची संपर्क करून त्यांना आरोपीबाबतची व उपचार बाबतची माहिती दिली. राकेश ला अधिक उपचाराची गरज असल्याने त्याला तात्काळ पोलिसांनी भारतीय विद्यापीठ हॉस्पिटल व त्यानंतर ससून हॉस्पिटल पुणे येथे उपचारा करता दाखल केले. आज पहाटे बेंगलोर येथील संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी ससून हॉस्पिटल येथे पोहोचले असून त्यांनी आरोपीकडे विचारपूस सुरू केलेली आहे. आरोपी हा पळून जाण्याचे व विषारी कीटकनाशके पिऊन आत्महत्या करण्याचे प्रयत्न होता.
परंतु त्याला नागरिक व पोलिसांनी तात्काळ दवाखान्यात दाखल करून व त्यानंतर पुढील चांगले प्रकारचे उपचारासाठी पुणे येथे वरिष्ठांचे मार्गदर्शनाप्रमाणे तात्काळ रवाना केले.