सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील कादवे येथील १३ आदिवासी कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी येथील नितीन राजेंद्र राऊत यांनी स्वतःच्या पैशातून जागा विकत घेऊन दिली. प्रांत अधिकारी डॉ.विकास खरात यांच्या हस्ते नितीन राऊत यांचा सन्मान करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की कादवे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आदिवासी कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती गेल्या अनेक वर्षांपासून ही कुटुंब घरकुल योजनेपासून वंचित आहेत ही बाब लक्षात येताच नितीन राजेंद्र राऊत यांनी कादवे येथील गट नंबर 714 मधून 11 आर जागा ही आदिवासी कुटुंबातील व्यक्तींना घरकुले बांधण्यासाठी दिली. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला आदिवासी कुटुंबातील घरकुलांचा प्रश्न यामुळे मार्गी लागला आहे. त्याबद्दल उपविभागीय अधिकारी डॉक्टर विकास खरात यांच्या हस्ते नितीन राऊत यांना सन्मान करण्यात आला यावेळी तहसीलदार निवास ढाणे गटविकास अधिकारी पंकज शेळके सामाजिक कार्यकर्ते अंकुश पासलकर राहुल ठाकर, लक्ष्मण ढेबे उपस्थित होते.
-----------------------
तारका अर्बन समूह च्या माध्यमातून तालुक्यात अनेक समाज उपयोगी उपक्रम सुरू असून आदिवासी कुटुंबांना घरकुलासाठी जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आव्हानानुसार व गटविकास अधिकारी पंकज शेळके यांनी केलेल्या विनंतीस ग्रामपंचायत सदस्य राहुल ठाकर अंकुश पासलकर यांच्या प्रोत्साहनामुळे ही जागा विकत घेऊन आदिवासी कुटुंबांना घरकुले बांधण्यासाठी मोफत दिली.