Phaltan Breaking l आदर्की खुर्द येथील 'रत्नशिव'चा घात की अपघात ?....अखेर आठ दिवसानंतर लोणंद पोलीसांकडून खूनाचा गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : निलेश काशिद
लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदर्की खुर्द या ठिकाणी मागील आठवड्यात १२ मार्च रोजी रत्नशिव संभाजी निंबाळकर राहणार. आदर्की खुर्द तालुका. फलटण याचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती मात्र सदर अपघात हा प्रेमसंबंध उघड करून बदनामी केल्याच्या रागातून केल्याचे पोलीसांनी तपासातून निष्पन्न केले.
       याबाबत लोणंद पोलीसांकडून मिळालेली अधिक माहीती अशी, आदर्की खुर्द येथील रत्नशिव निंबाळकर हा दि. १२ मार्च रोजी सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास MH -47-V-0549 या क्रमांकाच्या स्कूटर वरून जात असताना अनैतिक संबंधांची बदनामी केल्याच्या रागातून आदर्की खुर्द ते आदर्की बुद्रुक रोडवर इरटीगा क्रमांक MH -26-BX-6546 या गाडीने त्याला पाठीमागून जोरात धडक देऊन उडवून खाली पाडल्यावर गाडीतून उतरून विनोद महादेव राक्षे याने रत्नशिव निंबाळकर याचे हात धरून दत्तात्रेय उर्फ काका व्यंकट निंबाळकर याने कोयत्याने हातावर डोक्यात वार करून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केला आहे. म्हणून दत्तात्रेय उर्फ काका व्यंकट निंबाळकर, विनोद महादेव राक्षे दोन्ही राहणार आदर्की खुर्द तालुका फलटण जिल्हा सातारा यांचे विरुद्ध कमलेश संभाजी निंबाळकर वय 36 वर्ष यांनी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी लोणंद पोलीसांनी विनोद महादेव राक्षे यास अटक केली असून त्याची २५ मार्च पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधीक्षक राहुल धस यांनी घटनास्थळाला भेट दिली असून सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले पुढील तपास करत आहेत.
         दिनांक १२ रोजी सदर घटना घडल्यापासून आदर्की खुर्द गावात याप्रकरणी उलटसुलट चर्चा चालू होती. मात्र सुरवातीला कोणीही या घटनेबद्दल खुलेपणे चर्चा करत नव्हते मात्र हळहळू या घटनेचा बोभाटा होवून सत्य समोर आल्याने अखेर आठ दिवसानंतर याप्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल होवून एक आरोपीस अटक करण्यात आली असून दत्तात्रेय उर्फ काका व्यंकट निंबाळकर हा अजूनही फरार आहे.
To Top