भोर l महिलांनी कर्तुत्वाचा ठसा उमटवण्यास कमी पडू नये : वन उपविभागीय अधिकारी शितल राठोड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
स्त्री केवळ घराचा कणा नाही तर समाजाचा पाया आहे.स्त्री आई,बहीण,पत्नी,मुलगी,शिक्षिका,डॉक्टर, नेता अशा अनेक भूमिका पार पाडते.सध्या महिला सक्षम झाले असल्या स्त्रियांनी पुढील काळात आपल्या आयुष्यात कर्तुत्वाचा ठसा उमठवण्यास कमी पडू नये असे प्रतिपादन वन उपविभागीय अधिकारी शीतल राठोड यांनी केले.
   उन्नती महिला प्रतिष्ठान ,तनिष्का व्यासपीठ व मराठा महासंघ भोर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनी आदर्श महिलांचा सन्मान व स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला होता. यावेळी शितलव राठोड भोर येथे बोलत होत्या.यावेळी सामाजिक पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार भुजंगराव दाभाडे,पत्रकार पुरुषोत्तम मुसळे यांना देण्यात आला.तर समाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १५ कर्तुत्ववान महिला यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.तसेच कुस्ती क्षेत्रातील महिला पै.दर्शना म्हस्के (नेरे )हिचा विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी उन्नती महिला प्रतिष्ठान अध्यक्ष सीमा तनपुरे,शिला खोत,लक्ष्मण पारठे,विठ्ठल करंजे, विनायक तनपूरे,सचिन देशमुख,द्रोपदी भेलके,भाग्यश्री वरटे निर्मला किंद्रे,सविता थोपटे, मेघा आंबवले ,मीना चव्हाण, वैशाली बांदल ,विद्या कांबळे, संतोष कदम आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
To Top