Bhor Breaking l खळबळजनक...! सारोळ्यात निरा नदीपात्रालगत पोत्यात आढळला हात पाय बांधलेल्या तरुणाचा मृतदेह

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा ता.भोर येथील हॉटेल नानांचीवाडी लगतच्या निरा नदीपात्रात अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील पुरुषाचा मृतदेह रविवार दि.९ रोजी सकाळच्या सुमारास आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. तरुणाचा मृतदेह पोत्यात हात पाय बांधलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे प्राथमिक घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. 
     घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई,उपनिरीक्षक अजित पाटील,हवालदार मयूर निंबाळकर, अक्षय नलावडे, नाना मदने यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भोर येथील उपविभागीय रुग्णालयात पाठवला.मृतदेहाच्या गळ्यावर व्रण असून उजव्या हातावर "ओम" नाव कोरले आहे.परिसरात ३५-४० वयोगटातील कोणी व्यक्ती बेपत्ता असल्यास संपर्क करण्याचे आवाहन राजगड पोलिसांनी केले आहे. सदर घटनेबाबत अधिक तपास राजगड पोलीस करीत आहेत.

                                      
To Top