सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहराशेजारील भोलावडे गावच्या हद्दीत मळे ता.भोर येथील तरुणाचा मृतदेह रविवार दि.९ रोजी आढळला. ज्ञानेश्वर खुळे रा.मळे ( वय-४६ )असे मृत तरुणाचे नाव असून भोर पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी मृत व्यक्तीस उपजिल्हा रुग्णालय भोर येथे दाखल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक तरुण व्यक्ती भोर - महूडे मार्गावरील भोलावडे गावाजवळ मृत अवस्थेत पडल्याचे माहिती मिळाली.तात्काळ पोलीस उपनिरीक्षक शीला खोत,हवालदार पी.सी.मुलानी, वर्षा भोसले ,धर्मवीर खांडे ,विजयकुमार नवले दाखल होऊन मृत व्यक्तीची माहिती घेतली. तपास यंत्रणा सुरू करताच काही वेळातच हा मृत व्यक्ती मळे तालुका भोर येथील रहिवासी असल्याचे माहिती मिळाली.मृत व्यक्तीचे नातेवाईक यांना या घटनेची माहिती दिली असून मृत तरुणास उपजिल्हा रुग्णालय भोर येथे शवच्छेदनासाठी पाठवण्यात आले.सदरील तरुणाचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.
भोर तालुक्यात एकाच दिवसात २ तरुणांचे मृतदेह आढळले
मागील आठवड्यात सारोळा येथील नीरा नदी पात्रात एका व्यक्तीचा पाण्यात मृतदेह आढळला होता. त्याचा तपास सुरू असतानाच रविवार दि.९ रोजी दुपारच्यावेळी पुन्हा एकदा नीरा नदी पात्रात हातपाय बांधून पोत्यात घातलेला एक मृतदेह सापडला तर भोर शहराशेजारी सायंकाळच्या वेळी दुसरा मृतदेह मिळाल्याने भोर तालुक्यात एकाच दिवशी २ मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.