सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भिलार : रविकांत बेलोशे
काल सर्वत्र शिमगा म्हणजेच होळीचा सण उत्साहात साजरा झाला. या दिवशी लोक परंपरेने मोठ्या मैदानात मोठी होळी पेटवतात आणि त्याभोवती पारंपारिक गाणी लावून लोकनृत्य करतात. नैवैद्य दाखवला जातो. आज दुसरा दिवस म्हणजे धुळवड. जावळी तालुक्यातील बेलोशी या गावात युवकांनी विविध रंगी कलर बरोबरच, विविध प्रकारची पारंपरिक सोंगे घेऊन आणि वाद्यांच्या गजरात अनोख्या पद्धतीने शिगमोत्सवाचा आनंद दुगुणीत केला.
जावळी तालुक्यातील ग्रामीण भागात होळी व धूलिवंदन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज शहराबरोबरच ग्रामीण भागात लहान मुलांसह नागरिकांनी एकमेकांना रंग लावून धूलिवंदन साजरा केला. बेलोशी या गावात युवकांनी वेगवेगळे वेश परिधान करून, काहींनी दाढी मिशा लाऊन, काहींनी झाडांची पाने लाऊन वेगवेगळ्या वेशभूषा केल्या होत्या. यातील मास्क घालून चेटकीणीचा वेश परिधान केलेला युवक सर्वांचेच आकर्षण ठरत होता.
या मुलांच्या बरोबर ढोल, ताशा या पारंपरिक वाद्यांचा गजर होता. लहान लहान मुले या वेशभूषा पाहून भीत होते. प्रत्येकाच्या दारात जाऊन या मुलानी आपलं मागणं मागितले. आणि मनोरंजन केले रंगांच्या उधळनीबरोबरच मनात ही रंगांची उधळण करून अनोख्या पद्धतीने साजऱ्या झालेल्या या धुळवडीची आज अख्या जावळी तालुक्यात चर्चा चालू होती.
सध्या गावागावात समाजात , प्रत्येकाच्या मनामनात तणावाचे वातावरण आहे. या तणावातून बाहेर निघण्यासाठी आपले पारंपरिक सण उपयोगी पडतात. याच माध्यमातून रंगांची उधळण करून धुळवड साजरी करण्यापेक्षा रंगाने मनोरंजन करण्यापेक्षा या वर्षी आपण सर्वांनी विविध सोंगे परिधान करून गावातील लहान मुले तसेच महिला व नागरिकांचे मनोरंजन व्हावे. अशा रंगाची मन आनंदी व्हावे या उद्देशाने हा उपक्रम आमची युवा पिढीने व चिमुकल्यांनी केला असल्याचे यावेळी सरपंच उमेश बेलोशे यांनी सांगितले.