सुपे परगणा l डिपी प्लॅनच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक : सुपेकरांकडुन सुपे गाव 'बंद'चे हत्यार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथे नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला  प्रारुप विकास आराखडा ( डीपी प्लॅन) रद्द करावा याकरीता पुकारण्यात आलेल्या सुपे ' बंद ' ला ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी डिपी प्लॅनच्या विरोधात आक्रमक भुमिका घेतल्याचे चित्र आजच्या बंद मधुन दिसुन आले.
          येथील ग्रामसचिवालयाच्या आवारात सोमवारी ( दि. २४ ) ग्रामसभा घेण्यात आली होती. या ग्रामसभेत डीपी प्लॅनच्या विरोधात सर्वानुमते ठराव करण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने सुपे गाव गुरुवारी ( दि. २७ ) स्वयंस्फुर्तीने बंद ठेवुन डीपी प्लॅनला विरोध करण्याचा निर्णय झाला होता. 
       त्यानुसार सुप्यात गुरुवारी ( दि. २७ ) सकाळपासुन कडकडीत बंद पाळण्यात आला. येथील छोटी, मोठी दुकाने, हॉटेल, व्यापारी पेठ, वरची पेठ, माळअळी आदी परिसरातील सर्व दुकानदारांनी आपआपली दुकाने स्वयंस्फुर्तीने बंद ठेवुन डिपी प्लॅनला विरोध करण्यात आला. यावेळी येथील उपबाजार समितीमधील आडत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवुन सुपे बंद मध्ये सहभागी झाले होते. सुपे गाव बऱ्याच दिवसातुन बंद राहिल्याने ग्रामस्थांना कोरोनाचे फिलींग आले. आज उत्स्फुर्त बंद पाळल्यामुळे ठिकठिकाणी बसलेल्या ग्रामस्थांमधुन डिपी प्लॅनचीच चर्चा होत होती.  
         दरम्यान बारामती उपविभागातील सहाय्यक रचनाकार अधिकारी यांना सरपंच तुषार हिरवे आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत डिपी प्लॅन रद्द करावा. याबाबत ग्रामसभेच्या ठरावाची नक्कल आणि निवेदन देण्यात आले.
           .............................
To Top