Satara News l मित्र म्हणून जेवायला आले...! आणि घरातलं सोनं घेऊन पसार झाले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सातारा : प्रतिनिधी
जेवायला गेलेल्या घरातूनच रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे २ लाख ३६ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
              महंमद ऊर्फ गुड्डू फिरासद अन्सारी व तमन्ना महंमद अन्सारी (मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. मोळाचा ओढा) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत नम्रता युवराज अडसूळ (रा. शाहूपुरी) यांनी फिर्याद दिली आहे. वरील दोघांना जेवायला घरी बोलावले होते. या वेळी किचनमध्ये काम करत असताना दोघांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा २ लाख ३६ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार देशमुख तपास करत आहेत.
To Top