सोमेश्वर रिपोर्टर टीम------
फलटण : गणेश पवार
फलटण तालुक्यातील वाघोशी गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील प्रवीण विश्वासराव पवार याने सध्या सुरू असलेल्या आयपीएल सामन्यामध्ये ४९ रुपयाच्या 'माय इलेव्हन' नामक खेळामध्ये तब्बल तीन कोटी रुपये व महिंद्रा थार गाडीचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिंकले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फलटण तालुक्यातील वाघोशी या छोट्याशा गावातील प्रवीण पवार हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील युवक लातूरमध्ये खाजगी कंपनीमध्ये कामाला आहे बारावी शिक्षण झालेला प्रवीण पवार हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून सोमवार दि ३१ मार्च रोजी झालेल्या मुंबई व कोलकत्ता संघातील लढतीची त्याने माय इलेव्हन मध्ये मुंबईच्या बाजूने स्वतःची टीम तयार केली होती त्यामध्ये त्याचा प्रथम क्रमांक आला या बदल्यात माय इलेव्हन कडून तीन कोटी रुपये व महिंद्रा थार गाडी जिंकली आहे याबाबत वाघोशी सह संपूर्ण परिसरातून प्रवीण याचे अभिनंदन होत असून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांनी एवढी मोठी रक्कम जिंकल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त आहे.