Baramati News l सोमेश्वर कारखान्यातील कथित गैरव्यवहार प्रकरणी दोघांवर आरोपपत्र : ५४ लाख २९ हजारांचा कथित गैरव्यवहार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या टाईम ऑफिस मध्ये झालेल्या आर्थिक घोटाळा व भ्रष्टाचार प्रकरणी सोमेश्वर कारखान्याने नेमलेल्या चौकशी समितीने कामगार अधिकारी दीपक निंबाळकर व कर्मचारी रूपचंद साळुंखे यांना दोषी ठरवले असून चौकशीअंती या दोघांनी ५४ लाख २९ हजार रुपये आर्थिक घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असून आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी गुरुवार(दि.३) रोजी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, संचालक लक्ष्मण गोफणे, सेक्रेटरी कालिदास निकम उपस्थित होते.
                कर्मचारी व कामगार यांचे हजेरी नोंदीमध्ये संगनमताने कारखाना प्रशासनाची फसवणूक करून आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी कारखान्याचे लेबर व टाइम ऑफिस विभागातील लेबर ऑफिसर, हेड टाइम कीपर, टाइम कीपर, सर्व लिपिक व कर्मचारी यांचे गेल्या महिन्यात निलंबन करण्यात आले होते. कारखान्याने मेहता आणि शहा चार्चड अकाउंट कंपनी चौकशी समिती नेमली होती. समितीच्या वतीने सुरुवातीला १५ मार्चला चौकशी अहवाल येणार होता मात्र सन २०१७ ते २०२५ पर्यंतची कागदपत्रे तपासण्यात आल्याने अहवाल येण्यास थोडा विलंब झाला. ३१ मार्चला चौकशी समितीने अहवाल सादर केला. यामध्ये कामगार अधिकारी दीपक निंबाळकर आणि कर्मचारी रूपचंद साळुंखे यांना दोषी ठरविण्यात आले आहे. भ्रष्टाचार केलेली संपूर्ण रक्कम संबंधितांकडून वसूल करून केलेल्या गैरकृत्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती यादव यांनी दिली.  ॲड. मंगेश चव्हाण यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून ते गुन्हे दाखल प्रक्रिया, वसुली आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार आहे. यासाठी त्यांना वीस दिवसांचा कार्यकाल दिला असून त्यानंतर ते आपला अहवाल कारखान्याला सादर करणार आहेत.
          आर्थिक भ्रष्टाचार झाल्यानंतर कारखान्याने निंबाळकर आणि साळुंखे यांच्यासह अन्य चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. चौकशीअंती निंबाळकर आणि साळुंके दोषी आढळून आले आहेत. मात्र चार निलंबीत कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर कधी घेणार याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती यादव यांनी दिली. 
दरम्यान, हेड टाईमकीपर विलास निकम, क्लार्क दीपक भोसले, सुरेश होळकर, शिपाई श्री बनकर यांचा अपहारात कसलाही संबंध आढळून आला नाही. यामुळे हे चार जण निर्दोष ठरले आहेत. त्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्यासंदर्भात संचालक मंडळाच्या बैठकीत विषय घेतला जाणार आहे. तसेच कंत्राटदार शशिकांत जगताप यांचाही अपहारात संबंध आढळून आला नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली
.................
अशी काढली रक्कम.  
 सन २०१७-१८ - १८,१२५ रुपये. 
 सन २०१८-१९-  ६४,६२५ रुपये  
 सन २०१९-२० -  ५९८०० रुपये
सन २०२०-२१ -  २,१९५५०
सन २०२१- २२ -  ३,२९,९७५ 
सन २०२२ - २३  ९,६४०८०
सन २०२३-२४ -  १३,५४,७५०
सन २०२४-२५  -  २४,२८३००
एकूण = ५४ लाख २९ हजार रुपये.
To Top