बारामती l अजितदादांची नवीन चेहऱ्याला पसंती : दोन महिन्यापूर्वी केलं संचालक...! आज दिली 'सोमेश्वर'ची उपाध्यक्षपदाची धुरा

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी मिलिंद बळवंत कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कांबळे यांना अजित दादांनी दोनच महिन्यांपूर्वी संचालक पदाची जबाबदारी दिली होती. आणि आज उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. 
            उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्तपदी मिलिंद कांबळे यांची निवड करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. ३ रोजी जिजाऊ सभागृहात  झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचवलेल्या नावावर मासिक सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, संचालक संभाजी होळकर, संग्राम सोरटे, सुनील भगत, ऋषिकेश गायकवाड, शिवाजीराजे निंबाळकर, आनंदकुमार होळकर, विश्वास जगताप, प्रणिता खोमणे, कमल पवार, लक्ष्मण गोफणे, शैलेश रासकर, जितेंद्र निगडे, अनंत तांबे, तुषार माहुरकर, शांताराम कापरे, हरिभाऊ भोंडवे, किसन तांबे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, सचिव कालिदास निकम यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक प्रमोद दुर्गुडे यांनी काम पाहिले.
         
To Top