सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
सुपे येथील तयार करण्यात आलेला प्रारुप विकास आराखडा हा सर्वसामान्यांना पुरक असावा, तो अन्यायकारक असु नये असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
यावेळी पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात येईल. तसेच येत्या १८ एप्रिलला जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेवुन चर्चा करु असे सुळे यांनी सांगितले. प्लॅन रद्द न झाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा सुळे यांनी दिला आहे.
सुपे येथील ग्रामसचिवालय सभागृहात खासदार सुप्रिया सुळे यांनी ग्रामस्थांशी डीपी च्या संदर्भात संवाद साधला. यावेळी येथील ग्रामविकास अधिकारी महेंद्र बेंगारे यांनी डीपीच्या नकाशाबाबतची माहिती दिली.
यावेळी सुळे यांनी सुपेकरांवर लादलेल्या डीपीच्या संदर्भातील माहिती जाणुन घेतली. यावेळी डीपीमुळे अनेकांची घरे, काहींची गुंठेवारी तसेच शेत जमीनी जात असल्याने हा डीपी प्लॅन रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी सुळे यांच्याकडे केली. यावेळी युगेंद्र पवार उपस्थित होते.
यावेळी काही क्षेत्रावर टाकण्यात आलेले शैक्षणिक झोन, मोठे रस्ते, कत्तलखाना, पार्किंग, ग्रामपंचायत परपोज आरक्षण तर काही गुंठेवारीमध्ये केलेली आरक्षित जागा यामुळे अनेकांचे संसार उद्धस्त होणार आहेत. यामध्ये काहींनी १५ ते १८ लाख गुंतवुन एक एक गुंठा खरेदी केला आहे. त्यामुळे हा प्रारुप विकास आराखडा अन्यायकारक आहे. येथील ग्रामस्थांना विचारात घेवुन तो केलेला नसल्याने रद्द करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी सुळे यांच्याकडे केली.
यावेळी खडकवासला कालवा सल्लागार समिती सदस्य पोपट खैरे, माजी सभापती पोपट पानसरे, शंकरराव चांदगुडे, गणेश खैरे, सुयश जाधव, रोहन सरोदे आदी डीपी प्लॅनच्या चर्चेत सहभागी झाले होते.
दरम्यान सुळे म्हणाल्या कि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या काळात एक कायदा झालेला आहे. की डीपी प्लॅनमध्ये जर सर्वसामान्यांचे क्षेत्र जात असेल तर त्या क्षेत्राला चार पट बाजारभाव मिळाला पाहिजे असे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा डीपी प्लॅन सर्वसमावेशक नसुन तो रद्द लरण्याबाबत आपण येत्या १८ एप्रिलला जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटुन चर्चा करुअ असे सुळे यांनी सांगितले. तसेच पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच प्लॅन रद्द न केल्यास स्वत: उपोषणास बसण्याची ग्वाही दिली.
.............................