सुपे परगणा l सुपा मंडलांतर्गत जिवंत सातबारा मोहीम सुरु

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे येथील महसुल मंडलांतर्गत जिवंत सातबारा मोहिम राबविण्यात येत असुन आत्तापर्यंत या मंडलांतर्गत ५४ खातेदारांच्या वारस नोंदी धरण्यात आल्या असल्याची माहिती मंडलाधिकारी लक्ष्मीकांत मुळे यांनी दिली.
              बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर तसेच तहसिलदार गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिवंत सातबारा मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत सुपा मंडळातील एकूण आत्तापर्यंत १२ गावातील १५१ मयत शोधुन त्यातील ५४ मयत खातेदारांच्या वारस नोंदी धरल्या आहेत.
       या मोहिमेत मंडळ अधिकारी मुळे यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी निलम देशमुख, अनिता धापटे, निलेश गद्रे, राहुल गुळवे, राहुल केंद्रे, आशुतोष पाटील यांनी मयत खातेदार यांचे कागदपत्रे व अर्ज भरून घेण्याचे कामकाज अत्यंत वेगाने सुरु केले आहे.
       या मोहिमेत प्राप्त झालेले सर्व अर्ज पीडीई द्वारे भरून घेऊन एका महिन्यात वारस नोंदी होऊन वारसांची नावे सातबाऱ्याला येवून सदरचे सातबारा जिवंत होणार आहेत. तसेच जे खातेदार गावी राहत नाहीत त्यांना वारस नोंद करणेसाठी ग्राम महसूल कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. ते आपल्या स्वत:च्या  मोबईल वरून पीडीई मध्ये वारस नोंद करू शकतात अशी माहिती मुळे यांनी दिली.
      आजपर्यंत प्राप्त झालेली सुपा मंडळातील गावनिहाय मयताची आकडेवारी पुढीलप्रमाणे  सुपे - ९, दंडवाडी - २८, काळखैरेवाडी - २१, पानसरेवाडी - ११, भोंडवेवाडी - १५, चांदगुडेवाडी - ६, खंडूखैरवाडी - ३, कुतवळवाडी - १२, वढाणे - १४, नारोळी - ५ , कोळोली - १५ आणि देऊळगाव रसाळ - १२ अशी एकुण १५१ आहेत. 
        ............................................

To Top