Bhor News l भोरच्या बालवडीतील तरुण पुण्यातून बेपत्ता

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील बालवडी ता.भोर येथील कायमचा रहिवासी मात्र सध्या पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या अरुण गुलाब किंद्रे यांचा इयत्ता नववी मध्ये शिकणारा मुलगा प्रतीक अरुण किंद्रे( वय -१५) पुणे येथून घरातून निघून जाऊन बेपत्ता झाला असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. 
             प्रतीक अरूण किंद्रे खिरीडवस्ती, मोशी,पुणे येथून १ मार्चला दुपारी ५ वाजता घरातून निघून गेला असून त्याचा रंग सावळा,सडपातळ बांधा,उंचीने उंच असून अंगात लाल- पांढरा चौकोनी डिझाईनचा शर्ट आहे. प्रतीकबद्दल काही माहिती असेल, कुठेही दिसला असेल तर कृपया  ९०११७२५१९३ व ८६२५०३५५१९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Tags
To Top