सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
चोपडज ता. बारामती येथे दमदाटी व शिवीगाळ करत लोखंडी रॉडने जबर मारहाण करत एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विराज विजय निंबाळकर रा चोपडज ता. बारामती जि पुणे याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सागर सुरेश गाडेकर प्रविण विठ्ठल गाडे दोन्ही रा चोपडज ता बारामती जि पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१४ एप्रिल रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोपडज येथे विराज निंबाळकर याच्या राहते घराच्या टेरेसवर झोपत असताना आरोपी सागर गाडेकर याने विराज यास खाली बोलावुन घेवुन शिवीगाळ दमदाटी करून त्याच्या हातातील लोखंडी रॉडने विराजच्या डाव्या-पायावर ,डाव्या हातावर व पाठीत मारहाण करून त्यास गंभीर दुखापत केली तसेच आरोपी प्रवीण गाडे याने हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाऴ केली व दोघानी जिवे मारण्याची धमकी दिली आहे.