सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
४५ वी कुमार राज्यस्तरीय अजिक्यपद स्पर्धेत राजगड तालुक्यातील राजतोरण कुस्ती संकुल विंझर येथील पैलवान संग्राम संतोष दसवडकर याने ७१ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकाविला तर प्रथमेश अंकुश दसवडकर याने ८० किलो वजन गटात व्दितीय क्रमांक पटकाविला.
त्यांच्या या यशाबद्दल माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर यांनी त्यांचे अभिनंदन केले,
पुणे येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात ४५ वी कुमार राज्यस्तरीय अजिक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,या स्पर्धेत राजगड तालुक्यातील राजतोरण कुस्ती संकुल येथील पैलवान संग्राम दसवडकर यांने प्रथम क्रमांक व व्दितीय क्रमांक प्रथमेश दसवडकर यांने पटकाविला,माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर,वस्ताद रणधिरसिंग पांगल,अंकुश दसवडकर,राजाभाऊ लिम्हण,सतीश लिम्हण,काळुराम जगताप,अनिकेत व्यवहारे,विक्रम जगताप,चंद्रकांत चव्हाण,रविंद्र करंजकर आदींनी मार्गदर्शन केले.