सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील बारामती नंतर आता सोमेश्वरनगर याठिकाणी देखील क्रीडा हब होणार असल्याची माहिती सोमेश्वर सहकारी साखर कारखानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
सोमेश्वरनगर ता.बारामती येथे एक कोटी ५६ लाख रुपयाचे क्रीडा संकुलास नुकतीच राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली. सोमेश्वर कारखानाद्वारे त्यासाठी मोठा पाठपुरावा करण्यात आला त्याबद्दल बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना, सोमेश्वर स्पोर्ट अकॅडमी व क्रीडाप्रेमी यांच्यावतीने कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लातूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, ॲड गणेश आळंदीकर, रामदास कारंडे, भाऊसाहेब लकडे, शशिकांत जेधे, गणेश शेंडकर सोमेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव भारत खोमणे, बारामती तालुका ग्रा पत्रकार संघाचे सदस्य संतोष शेंडकर, कार्याध्यक्ष युवराज खोमणे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष महेश जगताप, ई. मान्यवर यावेळी उपस्थित होते. जगताप पुढे म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नेतृत्वाने सोमेश्वर कारखाना विविध विभागात राज्यात प्रथम आलेला आहे. बारामती मध्ये भव्य असे स्टेडियम देखील मंजूर झालेले आहे. त्यामुळे बारामती तालुका आता लवकरच क्रीडा पंढरी म्हणून नावलौकिकास येईल असे ते म्हणाले. परिसरातील अनेक विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. जगन्नाथ लकडे सारखे आंतरराष्ट्रीय धावपटू सोमेश्वर मध्येच तयार झाले. सुमारे १५ हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेत असल्याने शैक्षणिक हब म्हणून सोमेश्वर चा नावलौकिक आहे त्याचप्रमाणे क्रीडा संकुल झाल्यानंतर कोणताही खेळाडू मैदान व सुविधा यापासून वंचित राहणार नाही भविष्यात मोठ्या प्रमाणात क्रीडापटू या भागातून तयार होतील अशी खात्री त्यांनी यावेळी दिली. क्रीडा संकुलाच्या मंजुरीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी देखील मोठा पाठपुरावा केला त्यामुळे त्यांचा देखील सत्कार पुरुषोत्तम जगताप यांचे हस्ते करण्यात आला.