सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
लाटे (ता. बारामती) येथील हरिभाऊ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष दिलीपराव नीलकंठराव खलाटे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
आईसाहेब देवस्थानचे ते निस्सीम भक्त होते. आईसाहेब वारीचे ते संयोजन करत असत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे. विद्या प्रतिष्ठानच्या शिक्षिका दीप्ती जगताप, प्रगतशील शेतकरी सुचित्रा कदम, पणदरे आरोग्य केंद्राच्या तंत्रज्ञ धन्वंतरी खलाटे- घोरपडे यांचे ते वडील होत. विद्यमान सरपंच माधुरी विश्वासराव खलाटे यांचे ते मोठे दीर होत.