सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनच्या बारामती तालुका अध्यक्षपदी मुरूम (ता. बारामती ) येथील डॉ.अमोल सुरेशराव जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. १० एप्रिल रोजी बारामती येथे असोसिएशनच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात डॉ. अमोल जगताप यांची अध्यक्ष म्हणून, डॉ. सचिन लोणकर यांची सचिव म्हणून, डॉ. अमित भापकर यांची खजिनदार म्हणून तसेच डॉ. स्मिता बोके आणि डॉ. पल्लवी तावरे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. डॉ. रुपेश माने यांनी सहसचिव, डॉ. सागर रणवरे यांची सहखजिनदार म्हणून पदभार घेतला. डॉ. अमोल जगताप हे सोमेश्वरनगर परिसरात विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून मुरूम ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. यावेळी डॉ. नीलमकुमार शिरकांडे, डॉ. प्रदीप खलाटे, डॉ. गिरीश तवटे, डॉ. नंदकुमार झांबरे, डॉ. संग्राम देवकाते, डॉ. सचिन बालगुडे, डॉ. सुहासिनी सोनवले, डॉ. चेतन देवकाते, डॉ. चेतन जगताप, डॉ. अभिजीत बारवकर उपस्थित होते. सोमेश्वरनगर येथील डॉ.प्रदीप भोसले, डॉ. विलास काटकर, डॉ. मयूर खटावकर, डॉ. गणेश जगताप, डॉ.किर्तराज जगताप, डॉ. तेजश्री जगताप, डॉ. सुखदा जगताप, डॉ. मनोहर कदम, डॉ. सुधीर कदम, डॉ. प्रकाश कदम यांच्यासह मुरूम ग्रामस्थांनी डॉ. अमोल जगताप यांचे अभिनंदन केले.