सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने बुधवार (दि. १६ ) रोजी कोऱ्हाळे बुद्रुक येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, शारदानगर, मायक्रोसॉफ्ट कंपनी व ऑक्सफर्ड विद्यापिठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारीत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशीयल इंटेलिजन्स) या तंत्रज्ञाचा वापर करुन कृषि विज्ञान केंद्र, शारदानगर, येथे ऊस पिकाचा प्रत्यक्षिक प्लॉट केलेला आहे.
कारखान्याचे कोऱ्हाळे येथील सभासद डॉ. यशवंत नारायण भगत यांनी या तंत्रज्ञानाचा वापर १ जुलै २०२४ रोजी लागवड केलेल्या ऊसास केलेला आहे. याच ठिकाणी सोमेश्वर कारखान्याच्या वतीने बुधवार (दि. १६) रोजी सकाळी नऊ वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ महिने पुर्ण झालेला ऊस प्लॉट पाहणे व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय ) या तंत्रज्ञानाची माहिती के. व्हि. के. (एआय) टिमचे सदस्य आदित्य विलास भगत देणार आहेत. या तंत्रज्ञाची माहिती कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकरी सभासदांना मिळुन ऊस उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. या तंत्रज्ञानाबाबतचे शेतकऱ्यांचे शंकानिरसन करण्यात येणार आहे.
शेतकरी मेळाव्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी केले आहे.