Baramati News l पोरानं बापाच्या कष्टाचं चीज केलं...! गडदरवाडीच्या ड्रायव्हरचा दिव्यांग मुलगा बनला...मंत्रालयात महसूल सहाय्यक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : महेश जगताप
जर ध्येय समोर असेल तर कोणतेही परिस्थिती आणि कुठलाही व्यंग तुम्हाला तुमच्या ध्येयापासून लांब ठेवू शकत नाही. असेच काहीसे बारामती तालुक्यातील गडदरवाडी येथील डोळयांनी दिव्यांग असलेली कमेशराज बाळासाहेब मदने याने करून दाखवले आहे. 
              महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत कमेशराज ने दिव्यांगांमधून पाचवी रँक मिळवत मंत्रालयात महसूल सहाय्यक पदाला गवसणी घातली आहे. २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या. कमेशराजच्या घरची परिस्थिती सामान्य असून वडील ड्रायव्हर म्हणून काम करतात. कमेशराज ला सोमेश्वरनगर येथील विवेकानंद अभ्यासिकेचे गणेश सावंत यांनी मार्गदर्शन केले. 

To Top