Bhor News l संसाराचा गाडा हाकत शेतकरी कुटुंबातील मोहिनी नांगरे यांची महसूल सहाय्यक पदाला गवसणी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
जिद्द, चिकाटी आणि मेहनत या तिघांची सांगड घातल्यास यश आपोआप मागे धावते हे प्रत्यक्षात खानापूर ( नांगरेवाडी ) ता.भोर येथील शेतकरी कुटुंबातील नांगरे घराण्यातील मोहिनी अमित नांगरे या सुनेने उतरवून दाखवत यश मिळवीत महसूल सहाय्यक ( पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालय )पदाला गवसनी घातली.
          २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा घेण्यात आल्या होत्या. मोहरी (भिलारेवाडी) ता.भोर येथील मुळची मोहिनी सदाशिव भिलारे या शाळेत असतानाच पहिल्यापासून हुशार विद्यार्थिनी होती.सासरी आल्यानंतरही मोहिनीने अभ्यासात लक्ष केंद्रित केले होते.मोहिनी नांगरे हिने समाजात सध्या लग्न झाल्यानंतर मुली सासरी जाऊन संसाराच्या गाड्यात  गुरफटून जातात.घरच्या कामामुळे पुढील शिक्षण होत नाही तर अभ्यासही करता येत नाही ही प्रथा मोडीत काढीत लग्नानंतर सासरची परिस्थिती बेताची असतानाही घरची कामे करून अभ्यासावर जोर देत लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन पास होत घवघवीत यश मिळवले.मोहिनी हिचे वीसगाव खोरे तसेच भोर तालुक्यातून विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
Tags
To Top