सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर येथे कॅनॉल इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत असलेल्या रेश्मा हितेश जाधव ( गायकवाड) यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवून महसूल सहाय्यक, मुंबई या पदावर शिक्कामोर्तब केले आहे.
तरुण वयात पतीचे निधन झाल्यानंतर पाठीमागे एक लहान मुलगा असताना न डगमगता लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी मागच्या वर्षी कालवा निरीक्षक पद प्राप्त केले होते. यावर्षी दुसर्यांदा लोकसेवा आयोग परीक्षेत हे यश मिळवले आहे. छोट्या छोट्या अपयशातुन नाराज होऊन अनेक जण खचून जातात. प्रसंगी आत्महत्या देखील करतात. अशा सर्व लोकांना त्यांचे यश प्रेरणादायी ठरणार आहे. कालवा निरीक्षक म्हणून काम करीत असताना साखरवाडी ते वडगाव निंबाळकर प्रवास करून, लहान मुलांचा सांभाळ करीत त्यांनी हे यश मिळवले असल्याने परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.