सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
एसटी-को-ऑप-क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत कामगार संघटनेचा सर्व जागांवर दणदणीत विजय झाला आहे. बारामतीमधून दादासाहेब साळवे व राजेंद्र हाके हे बहुमताने निवडून आले आहेत.
सन 2025 ते सन 2029 या पंचवार्षिक निवडणुकित 15 जागेसाठी असताना विरोधी पॅनेलला या निवडणुकीत केवळ सातच उमेदवार देता आले, पर्यायाने 8 उमेदवार निवडणुकी पूर्वीच, बिनविरोध निवडून आले होते, राहिलेली सात जागेसाठी, लागलेल्या निवडणूक हि, कामगार संघटनेच्या पॅनेलसाठी एकतर्फी होती, या निवडणुकीमध्ये सदावर्तेच्या परिवर्तन पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडाला, सदावरतेच्या परिवर्तन पॅनलला एक हि जागा मिळाली नाही, सर्व उमेदवार यांची अनामत रक्कम सुद्धा जप्त झाली,
या निवडणुकी मध्ये बारामती मतदार संघातून, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून दादासाहेब वामन साळवे, तसेच भटक्या विमुक्त जाती जमाती या प्रवर्गातुन श्री राजेंद्र सुभानराव हाके, हे दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले, खरं तर या या प्रवर्गातून उभे असलेले दोन्ही उमेदवार,श्री अनंता टेके आणि श्री राजेंद्र हाके हे बारामती आगाराचे असल्याने असल्याने या लढती कडे संपुर्ण पुणे विभागाचे लक्ष लागून राहिले होते, परंतु श्री राजेंद्र हाके यांना बारामती मतदार संघात देखील प्रचंड मताधिक्य मिळाले, तसेच या मतदार संघातून, सर्वसाधारण गटातून, अमोल लावर आणि अजित येडे, यांना हि प्रचंड मताधिक्य मिळाले, या निकाला नंतर बारामती आगार, बारामती एमआयडीसी आगार, विभागीय कार्यशाळा बारामती, इंदापूर आगार, व दौंड आगारातील कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला, विजयी उमेदवारांचे सर्व कर्मचाऱ्याकडून अभिनंदन केले, काही आगारात डीजे लाऊन आनंद उत्सव साजरा केला गेला,
या निवडणुकी मध्ये कामगार संघटनेचे श्रीनाथ शेलार (अध्यक्ष ), शाहिद सय्यद ( माजी संचालक, एस टी सोसायटी ) प्रवीण सातव ( अध्यक्ष एमआयडीसी आगार) सचिन लोणकर ( सचिव एमआयडीसी आगार ) सोमनाथ गायकवाड (अध्यक्ष, विभागीय कार्यशाळा बारामती ) नंदू जाधव (सचिव विभागीय कार्यशाळा बारामती ) सोनबा वाडकर, विकास भोसले, बाळासो देवकाते, विकास सावंत, दत्ता सवाने, प्रवीण जाधव, संतोष जराड, संतोष गिरमे, मोहन चव्हाण, राजेश पवार, अन्सार शेख यां पदाधिकारी यांनी निवडणूकं जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली, तसेच प्रतिस्पर्धी उमेदवार अनंता टेके, शिवजी कोकरे व राजेंद्र होळकर यांच्या कडून निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य लाभलं, त्यामुळे निवडणूक शांत वातावरणात पार पडली.
येणाऱ्या काळात, संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमानराव ताटे, विभागीय अध्यक्ष, मोहन जेधे तसेच विभागीय सचिव, दिलीप परब यांचे मार्गदर्शन घेऊन, संस्थेच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील राहु, तसेच संस्थेची सभासद संख्या वाढविणे आणि सभासदास त्याच्या मागणी नुसार कर्ज पुरवठा करण्यास आमचे प्रधान्य राहील.