सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाजवणाऱ्या चार प्रसिद्ध पथकांना निमंत्रित केले आहे. सोबत एक झांज पथक सुध्दा मिरवणुकीची शान वाढवणार आहे. फटाका रोषणाई हे यावर्षीचे अजून एक आकर्षण ठरेल.
वाणेवाडी ता . बारामती येथील ग्रामदैवत श्री हनुमान जयंती उत्सवानिमित्त दिनांक 12 एप्रिल रोजी श्रीं ची भव्यदिव्य मिरवणूक रात्री 9 वाजल्यापासून निघणार असून ती उशिरा मध्यरात्री पर्यंत चालेल.
यावर्षी विविध रंगी बेरंगी नैसर्गिक फुलांच्या सजावट सहित प्रथमच रथ वापरला जाणार असून त्यामुळे सर्वांना सहज दर्शन घेता येईल अशी सोय केली गेली आहे. गावच्या पारंपरिक प्रसिद्ध बँड पथकासोबत यावर्षी पारंपरिक वाद्य लेझीम व ढोल वाजवणाऱ्या चार प्रसिद्ध पथकांना निमंत्रित केले आहे. सोबत एक झांज
पथक सुध्दा मिरवणुकीची शान वाढवणार आहे. फटाका रोषणाई हे यावर्षीचे अजून एक आकर्षण ठरेल . अजूनही पारंपारिक वाद्य असणारे पथक उस्फूर्त पणे मिरवणुकीत सामील होणार असेल तर त्यांना वाजवण्यासाठी छबीना कमिटी वेळ व जागा उपलब्ध करून देणार आहेत. या पथकांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
तरी छबीना कमिटी वाणेवाडी यांच्याकडून बाहेर गावावरून येणाऱ्या पथकांना आव्हान करण्यात आले आहे की त्यांनी हनुमान चरणी आपली सेवा द्यावी . व सर्व ग्रामस्थांना आव्हान करण्यात येत आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मिरवणुकीत सामील होऊन शिस्तीत व उत्साहाने हनुमान जयंती उत्सवात सामील व्हावे.