Indapur politics News l संतोष माने l तालुक्यातील राजकीय वातावरण तापले.....! कोणी घेतली महसूलमंत्र्यांची भेट...तर दोघांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
इंदापूर : संतोष माने 
इंदापूर तालुक्यातील राजकारण गेल्या पंधरा दिवसांपासून विविध चर्चेने रंगत आहे. त्याचे कारण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपले कुलदैवत इंदापूर तालुक्यातील नृसिंहपुर या ठिकाणी दर्शनासाठी आले असता, तालुक्याची लोकप्रतिनिधी या नात्याने क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी त्यांचे प्रोटोकॉलनुसार स्वागत केले. 
       मात्र त्याच वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, तसेच जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहून स्वागत केले. त्यानंतर मागील तीन दिवसांपूर्वी राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. ही भेट वास्तविक पाहता शैक्षणिक संकुल याच्या महसूल संदर्भात असली तरी, चर्चांना मात्र वेग आला आहे. त्यातच काल म्हणजे गुरुवारी जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू तथा इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूर सिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे सागर निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे प्रवीण माने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार का? या चर्चांना उदान आले आहे. वास्तविक पाहता इंदापूर तालुका हा बारामती शेजारी असल्याने सतत राजकीय चर्चांचे केंद्रबिंदू ठरत असतो. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याने हर्षवर्धन पाटील हे "घर वापसी "करणार का असे चर्चा रंगत असतानाच प्रवीण माने व मयूर सिंह पाटील यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सागर बंगल्यावर भेट घेतल्याने विविध चर्चांना उधान आले आहे. 
         त्यामुळे इंदापूर तालुक्यातील राजकारणाचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत हे मात्र कळण्यास वेळ लागणार आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोणते नेते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार? याबाबत मात्र आता तरी सांगणे शक्य नाही. राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नृसिंह पूर येथे स्वागत केले असले तरी, त्यामागे राजकीय जाणकार वेगळा अर्थ काढू शकतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यामध्ये प्रवेश केला. पक्षाचे चिन्हावर निवडणूक लढवली. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. असे असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांचे सलोख्याचे संबंध आहेत. राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री इंदापूर तालुक्यात येत असतील तर, त्यांचे स्वागत करणे माझे कर्तव्य आहे. असा व्यक्तिवाद हर्षवर्धन पाटील यांनी करून राजकीय विश्लेषकांच्या वया उंचावल्या. त्यातच काल प्रवीण माने व महर्षी पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. त्यामुळे उन्हाची जशी तीव्रता वाढत आहे, त्याच पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील राजकारण सुद्धा तापत असल्याचे स्पष्ट होते.
  
To Top