Baramati News l बारामतीत रविवारी भीमपुत्र आयडॉल सोहळा रंगणार : उपमुख्यमंत्री अजित पवार, नरेंद्र जाधव यांची उपस्थिती

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामतीतील संविधान विचारमंचाच्या वतीने या वर्षीपासून भीमपुत्र आयडॉल २०२५ या उपक्रमाची सुरुवात केली असून यावर्षीचा कार्यक्रम येत्या रविवारी २० एप्रिल रोजी बारामती शहरातील गदिमा सभागृहात साजरा होणार आहे.
         महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नरेंद्र जाधव या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या १२ व्यक्तींना सन्मान केला जाणार आहे. 
       यावेळी कल्पना सरोज, मुंबई, देवांश धनगर, आग्रा,डॉ. मुरहरी केळे, ठाणे,डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, अकलूज, राजेश चंद्रा, लखनौ,शेक चांद पाशा, हैद्राबाद ,सुमन धामणे , अहिल्यानगर ,सीए शंकर अंदानी, अहिल्यानगर , हनुमंत उर्फ बाबुराव केंद्रे, नागदरवाडी, ता. लोहा, जि.नांदेड, डॉ. रोहन अकोलकर, बारामती, मारुती बनसोडे, नळदुर्ग, जि. धाराशिव, पांडुरंग सोनावणे, जेजुरी  या बारा व्यक्तिमत्वांचा यावेळी सन्मान केला जाणार आहे. 
       सर्व बारामतीकरांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित रहावे अशी विनंती संविधान विचारमंचामार्फत करण्यात आली आहे.
To Top