Baramati News l लहानपणापासून आजोबांनी केला सांभाळ...! घराचा गाडा हाकण्यासाठी साखर कारखान्यात 'वॉचमन'ची नोकरी..आज बनला मंत्रालयात क्लार्क

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील संदीप कोळपे याने परिस्थितीवर मात करत एमपीएससी परिक्षेतून मंत्रालयात क्लार्क पदाला गवसणी घातली आहे. 
            वडीलांची साथ नसल्याने लहानपण वाणेवाडी ता. बारामती येथे आजोळीच गेले. आजोबा पोपटराव कोकरे यांनी सांभाळ केला. मामा आप्पासो कोकरे व शंकर कोकरे यांनी नेहमी प्रोत्साहन दिले. संदीपला एक मोठा भाऊ आहे. मोठे झाल्यावर घरची जबाबदारी उचलण्यासाठी २०१७ साली सोमेश्वर कारखान्यात वॉचमनची नोकरी केली. नोकरी करत जिद्दीने वाघाळवाडी येथील रणधीर निंबरकर यांच्या मातोश्री अभ्यासिका व सोमेश्वरनगर येथील गणेश सावंत यांच्या विवेकानंद अभ्यासिकेतून अभ्यास केला. हे करत असताना संदीपला दोन्ही शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सिफ्टमध्ये काम आणि त्यानंतर अभ्यास करत संदीपने दुसऱ्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे. २०२३ मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेत संदीपने वैद्यकीय विभागात २४१ वी रँक मिळवली आहे. त्याच्या निवडीने सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव तसेच सर्व संचालक मंडळ, वाणेवाडीच्या सरपंच गीतांजली जगताप यांनी अभिनंदन केले आहे.
To Top