सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : महेश जगताप
बारामती तालुक्यातील वाणेवाडी गावातील सर्व सामान्य कुटुंबातील हेमंत फरांदे याने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या झापुक झुपुक या मराठी चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्याच्या वर्गमित्रांनी आपल्या मित्राचा चित्रपट सर्वांना पाहता यावा यासाठी दि.२६ एप्रिलला वाणेवाडी येथील नवनाथ थिएटर मध्ये ६ ते ९ चा पूर्ण शोच बुक केला आहे.
बारामती तालुक्यातील मोढवे गावचा बिग बॉस विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिका असलेला झापुक-झुपुक हा मराठी चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याचे चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटातील दोन्ही मुख्य भूमिका ह्या बारामतीच्या सुपुत्रांनी साकार केल्या आहेत. वाणेवाडी गावाचा हेमंत फरांदे याने या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका साकारली आहे.
सुरज चव्हाण हा बारामती तालुका मोढवे गावाचा तर याच चित्रपटात मुख्य व्हिलनची भूमिका साकारलेला हेमंत फरांदे हा बारामती तालुक्यातील वाणेवाडी गावातील एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा. तो या चित्रपटात व्हीलनची मुख्य भूमिका साकारत असून त्याने आतापर्यंत केलेल्या छोट्या-मोठ्या भूमिकांमधून आपली छाप सोडली आहे.
या सिनेमाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटात सूरज चव्हाण व हेमंत फरांदे सोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. या
हेमंत फरांदे याचे मध्यमिक शिक्षण सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर याठिकाणी झाले आहे. मित्राच्या प्रेमापोटी सर्व वर्गमित्रांनी वर्गणी गोळा करत..मित्रांना व नातेवाईकांना हा चित्रपट बघता यावा म्हणून वाणेवाडी येथील नवनाथ थिएटर बुक केलं आहे. २००७ च्या दहावीच्या बॅच मधील सर्व वर्ग मित्रांनी या शोचे आयोजन केले आहे. पूनम आळंदीकर, स्वप्नील गायकवाड, स्वप्नील करांडे यांनी या कामी पुढाकार घेतला आहे.