Bhor Breaking l वरंधा घाटातील शिरगाव हद्दीत तरुणाचा मृतदेह आढळला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील शिरगाव ता.भोर हद्दीत ४० ते ४५ वयाच्या तरुणाचा मृतदेह स्थानिकांना शुक्रवार दि.२५ रोजी आढळला असून स्थानिकांनी पोलीस ठाण्याची संपर्क करून माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 
         वरंधा घाटात मागील वर्षभरात मृतदेह आढळण्याचे सत्र थांबले होते. मात्र शुक्रवार दि.२५ रोजी पुन्हा एकदा मृतदेह सापडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.शिरगाव येथील हद्दीत एका रस्त्याच्या शेजारी हा तरुणाचा मृतदेह आढळला असून पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.
To Top