सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजेपूल-सोमेश्वरनगर येथे डॉ. जोगळेकर फर्टिलिटी सेंटर व सानवी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वंध्यत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर शनिवार दि.26 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत सानवी हॉस्पिटल पार पडणार आहे. यावेळी पुरुषांमधील मंद हालचालींचे शुक्राणू असणे, शुक्राणूंची प्रमाण कमी असणे तसेच कमी गुणवत्तेचे शुक्राणू असणे तर महिलांमधील अनियमित मासिक स्त्री बीज निर्मितीत अडचण येणे, अनियमित मासिक पाळी-गर्भनलिका बंद असणे, वारंवार iui / ivf फेल होत असल्यास तसेच वारंवार गर्भपात होणे. आदी समस्यांचे निरासन या शिबिरात होणार आहे. तसेच यामध्ये शिबिराअंतर्गत तपासणीवर २५ टक्क्यांची सूट मिळणार आहे. असल्याची माहिती डॉ. जोगळेकर व डॉ. अमोल जगताप यांनी दिली.