सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहराजवळून वाहणाऱ्या निरा नदी पात्रात धोबी घटनजिक पोहताना कारी ता.भोर ( सध्या रा. आमराई आळी भोर) येथील अल्पवयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कार येथील चिकने कुटुंबीय आमराईळी भोर येथे राहत होते. चिकणे यांचा सोळा वर्षीय मुलगा नीरा नदी पात्रात धोबी घाटाजवळ पोहोचण्यासाठी गेला होता.पाण्यात पोहताना या अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाला. भोर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अल्पवयीन तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. पुढील तपास भोर पोलीस करीत आहेत.