सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
सुपे ( ता. बारामती ) येथील हजरत ख्वाजा शाहमन्सुर दर्गा ट्रस्टची समिती वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने संभाजीनगर वक्फ मंडळाच्यावतीने सुपे दर्गा ट्रस्टच्या समितीची तात्पुरती निवड करण्यात आली आहे.
मागिल सात वर्षापासुन दर्गा ट्रस्ट मुख्य विश्वस्त समिती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आम्हीच या ट्रस्टच्या समितीचे सदस्य आहोत असे दोन्ही गट सांगत आहेत. त्यामुळे हा वाद संभाजीनगर वक्फ मंडळाकडे गेली सात वर्षापासुन सुरु आहे.
मात्र येथील वाद मागिल आकरा महिने थंडावलेला असतो. तर येथील हजरत ख्वाजा शाहमन्सुर बाबांचा उरुस जवळ आल्यावर या वादाला पुन्हा तोंड फुटते.
जिल्हा वक्फ अधिकारी सोहेल सय्यद यांनी संभाजीनगर वक्फ मंडळाचे पत्र येथील दर्गा ट्रस्ट दिले आहे. या पत्रात सुपे दर्गा ट्रस्टच्या समितीची तात्पुरती निवड करण्यात आली आहे. यामध्ये दैनंदिनी व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र वक्फ मंडळाच्या बैठकित पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत चिफ ट्रस्टी म्हणुन हमीद गुलाब डफेदार तर उपाध्यक्ष युनुस मेहबुब बागवान आणि सचिवपदी जमीर अहमद काझी तसेच इतर आठ जणांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणात वक्फ मंडळाने अंतिम निर्णय दिल्यानंतर ही समिती आपोआप संपुष्ठात येईल असे सभाजीनगर येथील महाराष्ट्र वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद यांनी दिलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा वक्फचे अधिकारी सोहेल सय्यद यांनी माजी चिफ ट्रस्टी युनुस कोतवाल यांना कार्यालयाच्या चाव्या मागितल्या. मात्र त्यांनी देण्यास नकार दिला. त्यानंतर सय्यद यांनी कुलुप तोडुन नव्या समितीला कार्यालयाचा ताबा दिला. तसेच आतील काही कामकाजाचे दप्तर असेल त्यास सिल करण्यात येवुन पुढील आदेश येईपर्यत आपण व्यवस्थापन पहावे असे सय्यद यांनी सांगितले.
तर पुढील महिण्यात येणारा बाबांचा उरुस सर्वांनी शांततेत पार पाडावा. तसेच यासंदर्भात काही कायद्याचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे येथील सहाय्यक पोलिस निरिक्षक मनोजकुमार नवसरे यांनी सांगितले.
दरम्यान आम्हाला वक्फ मंडळाने कोणतीही पुर्व कल्पना न देता व्यवस्थापन कामकाज सोडण्यास सांगितले. त्यामुळे आम्ही यासंदर्भातील न्याय न्यायालयात मागु असे यापुर्वीचे चिफ ट्रस्टी युनुस कोतवाल यांनी सांगितले.
.............................................