Bhor News l कृषिमंत्री कोकाटे यांचे शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य : भोरला शिवसेनेकडून निषेध

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के  
राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी नाशिक येथे शेतकऱ्यांची थट्टा करीत शेतकऱ्यांच्या विरोधात  बेताल वक्तव्य केले. त्याचा निषेध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भोर यांच्यावतीने पोलीस ठाण्यात निषेदाचे निवेदन देऊन करण्यात आला.          यावेळी उपजिल्हाप्रमुख शैलेश वालगुडे ,जिल्हा संघटक माऊली शिंदे,युवासेना जिल्हाअधिकारी  आदित्य बोरगे,भोर तालुकाप्रमुख हनुमंत कंक शरद जाधव, उपतालुकाप्रमुख,श्रीकांत लिम्हण विजय सातपुते, दीपक धामणसे, शहर प्रमुख,आप्पा काटकर, शिवसैनिक आनंदा गोळे,विकास बांदल, शंकर पडवळ,.विष्णू दानवले, शिवसैनिक शंकर मांढरे, शिवसैनिक संदीप राजवडे, माजी भोर शहरप्रमुख  काका शेटे,उपशहर प्रमुख चंदन कोळसकर, संजय सणस आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.प्रामाणिकपणे कष्ट करून जगणारा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.शेतकऱ्यांच्या विरोधात  बोलणाऱ्यांचे तसेच त्यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्यांचे खपवून घेतले जाणार नाही असे तालुकाप्रमुख हनुमंत कंक यांनी सांगितले.
Tags
To Top