सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे : प्रतिनिधी
वेल्हे ते चेलाडी रोडवर विंझर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 134 वी जयंती निमीत्त लावण्यात आलेले फ्लेक्स येथील एका इसमाने फाडले असून तत्काळ त्यास अटक करण्यात आली असल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली. याबाबत सकाळी दोन तास भीम प्रेमींनी वेल्हे ते चेलाडी रस्ता अडवला होता.याबाबतची तक्रार उल्हास गायकवाड यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात दिली.
--याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 7 एप्रिल रोजी रात्रौ 12:30 वा. चे सुमारास विंझर गावचे कमानी जवळ वेल्हे ते चेलाडी रोडचे दुतर्फा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 134 वी जयंती निमीत्त नरेश विनोद गायकवाड, सुयश चद्रकांत गायकवाड, स्वराज विलास गायकवाड, विजय संजय गायकवाड असे फ्लेक्स बोर्ड लावत असताना राजु बबन भोसले रा. भुरुकवाडी विझर हा त्यांची मोटारसायकल क्र MH-14-JV-2614 ही फ्लेक्स बोर्डवर घालुन त्यांने "तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फ्लेक्स लावु नका फ्लेक्स लावल्यावर बघा काय करतो ते मी, तो फाडुन टाकणार काय माझं वाकड करांयच ते करा... जयंतीचा कार्यक्रम कसा करता ते बघतोच" असे म्हणुन विजय संजय गायकवाड यास राजु भोसले याने हाताने दोन वेळा डोकयात मारले व निघून गेला त्यानंतर रात्रौ 1:18 ते रात्रौ 1:23 वा. चे दरम्यान राजु भोसले याने हातातील ब्लेडने लावण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची 134 वी जयंतीची फ्लेक्स बोर्ड फाडुन नुकसान करुन विटंबना केली आहे. याबाबत उल्हास काळुराम गायकवाड यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या घटनेत नंतर काही वेळ गावात तणाव निर्माण झाला होता वेल्हे ते चलाडी रस्ता भीमसैनिकांनी दोन तास रोखून धरला होता. आरोपीला तात्काळ अटक करा अशी मागणी यावेळी भीमसैनिकांनी केली. पोलिसांनी ताबडतोब सूत्रे हलवीत आरोपीला त्वरित अटक केली.
आरोपीला जास्तीत जास्त कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष कुंदन गंगावणे, सिद्धार्थ गायकवाड, वंचित बहुजन युवा विकासासाठीचे जिल्हाध्यक्ष अभिषेक वैराट, प्रदीप कांबळे, दिनेश गायकवाड, खंडू गायकवाड, अमोल गायकवाड, राहुल रणखांबे, रिपाइंचे भोर हवेली चे अध्यक्ष प्रविण ओहाळ, यांनी वेल्हे पोलिसांना निवेदन देऊन केली आहे.
आरोपी राजू बबन भोसले यास अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले जाणार आहे अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांनी दिली.
याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी करीत आहेत.