सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी नाशिक येथे शेतकऱ्यांची थट्टा करीत शेतकऱ्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केले. त्याचा निषेध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वेल्हे यांच्यावतीने पोलीस ठाण्यात निषेदाचे निवेदन देऊन करण्यात आला.
यावेळी शिवसेना राजगड तालुका प्रमुख उमेश नलावडे युवा सेना उपजिल्हा प्रमुख गणेश उफाळे, विभाग प्रमुख बाळासाहेब पिलावरे, प्रसिद्ध प्रमुख
युवराज चऱ्हाटे,विभाग प्रमुख प्रमोद कुचेकर दिलीप नलावडे बापू काकडे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.प्रामाणिकपणे कष्ट करून जगणारा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांचे तसेच त्यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्यांचे खपवून घेतले जाणार नाही असे तालुकाप्रमुख उमेश नलावडे यांनी सांगितले.