सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : वार्ताहर
पुरंदर तालुक्यातील थापेवाडी येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित थापेवाडीचे चेअरमन राजाराम खवले यांची मुदत संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त जागी झालेल्या निवडणुकीत एकच अर्ज आल्यांने रोहित सोपान खवले यांची सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अमरीन बागवान यांनी जाहीर केले.
थापेवाडी भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदाच्या पार पडलेल्या निवडणुकीत रोहित खवले यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध जाहीर झाली.
यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन राजाराम खवले, व्हाईस चेअरमन चंद्रभागा खवले यांचा निवडीचा सत्कार पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी सरपंच रुपाली खवले, उपसरपंच सुरेश खवले, माजी सरपंच निलेश जगदाळे, समीर तरवडे, थापे-वारवडीच्या माजी सरपंच वर्षाताई खवले,बाळासाहेब दूरकर, दत्तात्रेय जगदाळे, बाळासाहेब रावडे, संचालक हनुमंत खवले, संदिप खवले, लक्ष्मण खवले, शारदा खवले, बाळासो खवले, धोंडीबा खवले, उत्तम खवले, अशोक खवले, गणेश खवले, शिवाजी खवले,शंकर वाडकर, रमेश वाडकर ,रमेश खवले, सर्जेराव खवले ,विलास खवले आदीसह थापेवाडीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी चेअरमनपदी निवड झाल्यानंतर रोहित खवले म्हणाले सर्व ग्रामस्थांना विचारात घेऊन सभासद घेतले जातील व कर्जवाटप केले जाईल. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यासाठी कायम तत्पर राहील. प्रास्ताविक सचिव राहूल शेंडकर यांनी केले. सुञसंचालन माजी सरपंच निलेश जगदाळे यांनी केले. तर योगेश जगदाळे यांनी आभार मानले.