सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : संतोष माने
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील भादलवाडी येथील यात्रेला मागील दोन वर्ष ट्रस्ट व सामूहिक रित्या यात्रेचे नियोजन यावरून गालबोट लागले होते. परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत वादी व प्रतिवादी यांना बाजूला करून नवीन यात्रा कमिटी निर्माण करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार नवीन यात्रा कमिटीची निवड करण्यात आली.
सर्व ग्रामस्थांच्या सर्वानुमती प्रत्येक घराण्यातील किंवा सर्व समाजातील व्यक्तींचा या यात्रा कमिटीमध्ये समावेश आहे. त्यामुळे साहजिकच लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वीस सदस्यांची नवीन यात्रा कमिटी स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक यात्रा कमिटी सदस्याला अधिकृत ओळखपत्र, स्व इच्छेनुसार वर्गणी देणाऱ्यांची यादी देण्यात आली असून, प्रत्येकाने आपापली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडावी. असेही सांगण्यात आले आहे. तसेच यात्रेचे काळात उत्तम रित्या काम करून येणाऱ्या भाविक भक्तांना कुठलाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. मागील दोन वर्ष यात्रा पार पडली. परंतु यात्रा वादामध्ये असल्याने फक्त धार्मिक कार्यक्रम पार पडले. मनोरंजनाचे कार्यक्रम अर्थात लोकनाट्य तमाशा किंवा कुस्तीचे मैदान पार पडले नव्हते. त्यामुळे साहजिकच ग्रामस्थांमध्ये निराशाची भावना होती. परंतु यावर्षी नवीन यात्रा कमिटी निर्माण होऊन यावेळेस धार्मिक कार्यक्रम असं मनोरंजनाचे कार्यक्रम, कुस्तीचे मैदान होणार आहे. 27 एप्रिल व 28 एप्रिल या दोन दिवस भादलवाडी येथील भैरवनाथ देवाचा यात्रा उत्सव साजरा होणार आहे. यात्रा म्हटले की, बाहेरगावी गेलेल्या गावातील व्यक्ती, मित्रमंडळी, पाहुणे, नातेवाईक हे यात्रेचे रूपाने एकत्र येतात. यातून जुने गोष्टींचा उजाळा मिळतो. किंवा अनेक वर्षातून आपण एकत्र भेटलो याचा सुद्धा आनंद मिळतो. त्यामुळे कुठल्याही गावातील यात्रा उत्सव होत असताना सर्वांनी एकत्र येऊन, एकोप्याने किंवा मतभेद विसरून काम केल्यास कुठलीही गोष्ट अशक्य नसती नसते. वर्षातून एकच वेळेस साजरा होणारा यात्रा उत्सव सर्वांनी सामाजिक बांधिलकीतून अत्यंत उत्साहात साजरा करणे गरजेचे आहे.