Khandala News l सहा जणांच्या टोळक्याकडून कोयता, दांडक्याने मारहाण : लोणंद पोलीसात गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद येथे सहा जणांच्या टोळक्याची दोघांना कोयता दांडक्याने लाथाबुक्यानी मारहाण लोणंद गावच्या हद्दीत महावीर चौक येथे सहा जणांच्या टोळक्याची दोघांना कोयता दांडक्याने लाथाबुक्यानी मारहाण केली असून लोणंद पोलीस स्टेशन येथे आण्णा जाधव विशाल जाधव (पूर्ण नाव माहित नाही) व इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
         याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरून मिळालेली अधिक माहिती अशी की सोमवारी रात्री 11.00 वा चे सुमारास अनिकेत जालिंदर माने व त्याचा मित्र आकाश दत्तात्रय शेळके असे महावीर चौक लोणंद ता.खंडाळा येथून घरी जात असताना अण्णा जाधव , विशाल जाधव व इतर चार जण असे त्यांच्या जवळ येऊन तुम्ही इथे काय करताय कशासाठी उभे राहिला आहे मगाशी आम्हाला तुम्ही दोघांनी धक्का दिला का असे म्हणून अनिकेत माने याला डोक्यात कोयत्याने दांडक्याने खांद्यावर मारहाण केली तसेच त्याचा मित्र आकाश दत्तात्रय शेळके रा. वेताळ पेठ लोणंद यास पायाचे मांडीला मारहाण केली तसेच त्यांचे बरोबर असलेली अनोळखी 4 इसमानी शिवीगाळ दमदाटी करून लाथा बुक्क्याने मारहाण केली आहे.अशी फिर्याद अनिकेत माने याने लोणंद पोलीस स्टेशनला दिली असून लोणंद पोलीस स्टेशन येथे सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस संतोष नाळे हे करीत आहेत. 
------------------------
लोणंद शहर ही मोठी बाजारपेठ असून गुन्हेगारी वाढताना दिसत आहे मागील पाच दिवसापूर्वीच लोणंद येथे एकाचा छातीत चाकू भोसकून निर्घृण खुन करण्यात आला होता आणि ही कोयत्याने वार करण्याची या आठवड्यातील दुसरी घटना आहे लोणंद परिसरात मागील महिनाभरापासून.खुन मारहाण होण्याचे प्रकार वाढल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.सध्या किरकोळ कारणातून मारामारी आणि.मारामारीच्या घटनांमध्ये घातक हत्यारे सहजपणे खुलेआम बाहेर काढली जात आहेत. पोलिसांचा धाक गुन्हेगारांना उरला नसल्याचे दिसत आहे.
To Top