सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील रोटरी क्लब ऑफ सुपे, परगणा या संस्थेने नविन वेगवेगळे प्रोजेक्ट सादर केल्यास त्यांस आर्थिक पाठबळ दिले जाईल अशी ग्वाही रोटरी क्लब पुणे 3131चे DG रो. शीतल शहा यांनी दिली.
सुपे येथील रोटरी क्लबची सर्वसाधारण वार्षिक सभा नुकतीच पार पडली. यावेळी शहा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
याप्रसंगी येथील रोटरीचे अध्यक्ष शहाजी चांदगुडे यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सुर्यकांत कुंभार यांना आरसीसी क्लबचे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच या फौंडेशनच्या कार्यासाठी शहाजी चांदगुडे आणि राजेंद्र ढम यांनी प्रत्येकी पाच हजाराची देणगी दिली.
याप्रसंगी रोटरी क्लब पुणे 3131चे AG राकेश गानबोटे, चारुदत्त क्षोत्री, येथील संस्थापक अध्यक्ष सुभाष चांदगुडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक बसाळे यांनी केले. तर सचिव अशोक लोणकर, पोपट चिपाडे आदींनी प्रमुख पाहुण्यांचे गुलाब पुष्प देवुन स्वागत केले. कार्यक्रमाचे आभार सुर्यकांत कुंभार यांनी मानले.
..............................