Pune-Baramati l मोढवेचा 'हिरो'...! आणि वाणेवाडीचा 'व्हिलन'...! झापुक-झुपुक २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : महेश जगताप
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिका असलेला झापुक-झुपुक हा मराठी चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचे चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटातील दोन्ही मुख्य भूमिका ह्या बारामतीच्या सुपुत्रांनी साकार केल्या आहेत. 
सुरज चव्हाण हा बारामती तालुका मोढवे गावाचा तर याच चित्रपटात मुख्य व्हिलनची भूमिका साकारलेला हेमंत फरांदे हा बारामती तालुक्यातील वाणेवाडी गावातील एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा. तो या चित्रपटात व्हीलनची मुख्य भूमिका साकारत असून त्याने आतापर्यंत केलेल्या छोट्या-मोठ्या भूमिकांमधून आपली छाप सोडली आहे. त्याच्याकडे भविष्यातील सयाजी शिंदे म्हणून पाहिलं जात आहे.
           झापुक-झुपुक चित्रपट आता मराठी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. तो लवकरच चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटाचा टेलर गेले अनेक दिवस झाले सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात सूरज चव्हाणसोबत अनेक मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटात एक धमाल लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे.  सूरज चव्हाणचा 'झापूक झुपूक' हा चित्रपट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाच्या प्रोमो टीझरमध्ये सुरुवातीला कोणाच्या तरी लग्नाची वाजत गाजत वरात दिसत आहे. सूरज चव्हाण या वरातमीध्ये नाचताना दिसत आहे. त्यानंतर तो चिडलेला दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा प्रोमो चर्चेत आहे.
To Top