Mumbai News l काँग्रेसची साथ सोडत भोरचे मा.आमदार संग्राम थोपटे भाजपवाशी : भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईत केला जाहीर प्रवेश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मुंबई : संतोष म्हस्के
माजी आमदार संग्राम थोपटे भाजपात प्रवेश करणार या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून आज मंगळवार दि.२२ रोजी मुंबई येथे भाजपा पक्ष कार्यालयात माजी आमदार थोपटे यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार गोरे, राहुल कुल तसेच भोर तालुक्यातील भाजप कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. 
           काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत म्हणून काम करीत तीन टर्मला आमदार राहिलेले माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसने मंत्री,विधानसभा अध्यक्ष तसेच विरोधी पक्षनेते पदाची आलेली संधी पक्षाने डावल्याने नाराजी व्यक्त करीत भोर-वेल्हा-मुळशीतील हजारो  कार्यकर्त्यांच्या विचारविनमयाने भाजप पक्षात प्रवेश केला.यावेळी भोर - वेल्हा - मुळशी विधानसभा मतदारसंघातील पहिल्या फळीतील बहुतांशी कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करीत उपस्थिती दाखवली. 
                                     
To Top