सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील पाबे येथील राजू प्रभाकर रेणुसे यांची भारतीय जनता पक्षाच्या राजगड तालुका अध्यक्षपदी फेर निवड झाली आहे.
भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशपातळीवर हाती घेतलेल्या संघटनात्मक निवडणूक कार्यक्रमांतर्गत राजगड तालुका अध्यक्षपदी राजू रेणुसे यांची फेऱनिवड करण्यात आली. राजु प्रभाकर रेणुसे तालुक्यातील जुने कार्यकर्ते असून त्यांनी या पूर्वी भाजपा कडून पंचायत समितीची निवडणूक लढवली असून सहा महिन्यापूर्वीच त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांचा कामाचा अनुभव व आवाका पाहून जिल्हा अध्यक्ष वासुदेवनाना काळे यांनी सर्वानुमते त्यांची राजगड तालुका अध्यक्षपदी फेरनियुक्ती केली आहे. या प्रसंगी तालुका निवडणूक अधिकारी संजय निगडे, जेष्ठ नेते नाना साबणे, माजी अध्यक्ष आनंद देशमाने,रवींद्र दसवडकर, दिनकर मळेकर, प्रशांत शिळीमकर, सचिन भरम, शुभम बेलदरे, राहुल रणखांबे,रोहिदास करंजकर, लक्ष्मण रणखांबे,नामदेव शिर्के, रवींद्र चोरगे, गणेश गोऱ्हे, निलेश खोपडे, भाऊ मरगळे, व तालुक्यातील आजी माजी कार्यकर्ते उपस्तित होते